चोरी केलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांसह दोघांना अटक

On: August 7, 2024 9:50 PM

जळगाव : तेरा हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांसह दोघा चोरट्यांना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. मुस्तकीम खान मन्नान खान (रा. नागझीरी रसलपुर रोड ता रावेर) आणि अमिर खान युनुस खान (रा. रसलपुर ग्रामपंचायत समोर ता रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. 

रावेर येथील ट्रॅक्टर चालक इकबाल खान गुलशर खान यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या गेल्या महिन्यात चोरी झाल्या होत्या. या घटने प्रकरणी त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविंद्र वंजारी, पोकाँ सचिन घुगे, पोकों विशाल पाटील, पोकाँ प्रमोद पाटील पोकॉ विकार शेख, पोकॉ अमोल जाधव, पोकाँ महेश मोगरे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा शोध लावून दोघा चोरट्यांना मुद्देमालासह अटक केली आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment