जळगाव उप कारागृहात दोन गटात वाद – एक जखमी

On: August 30, 2024 11:43 AM

जळगाव : जळगाव उप कारागृहात बंदीवानांच्या दोन गटात जोरदार वाद झाला असल्याचे वृत्त आहे. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने त्यात एक बंदी जखमी झाला आहे. जखमी बंदिवानास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले असल्याचे देखील वृत्त आहे. काही प्रमाणात दगडफेक झाल्याचे देखील म्हटले जात आहे.

जळगाव उपकारागृह कायम कोणत्या ना कोणत्या वादाच्या घटनेतून चर्चेत येत असते. कधी कैदी पळून जाणे, कधी कैद्यांमध्ये हाणामारी होणे अशा घटना जणू काही सामान्य झाल्या असल्याचे जनतेत बोलले जात आहे. घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment