रेल्वे प्लॅटफॉर्मवर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

On: September 3, 2024 12:00 PM

जळगाव : कजगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी इसमाची ओळख  पटवण्याचे आवाहन चाळीसगाव रेल्वे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. या मृत्युप्रकरणी चाळीसगाव रेल्वे स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या अनोळखी इसमाची कुणाला काही माहिती असल्यास सहायक फौजदार रामराव इंगळे यांच्याशी 9923168539 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले  आहे.

कजगाव रेल्वे स्टेशन कि.मी. 346/24 नजीक प्लॅटफॉर्म 1 व 2 वर आढळून आलेल्या या मयत इसमाची उंची अंदाजे 170 से.मी. असून नाक बसके आहे. रंग  सावळा असून बांधा सडपातळ आहे. त्याच्या उजव्या हातावर इंग्रजी अक्षरात जी.एन. असे गोंदलेले आहे. त्याच्या अंगावर गुलाबी रंगाचे मळकट फुल बाहीचे शर्ट व निळ्या रंगाची मळकट फुल पॅंट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment