वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी दोघे ताब्यात

On: September 3, 2024 2:21 PM

जळगाव : जळगाव शहराच्या खोटे नगर परिसरातील वृद्धेची 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी हत्या करुन मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावल्याच्या आरोपाखाली दोघा संशयीतांना जळगाव तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्नेहलता चुंबळे असे हत्या झालेल्या साठ वर्षाच्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

स्नेहलता चुंबळे यांच्याकडे तिस लाख रुपये असल्याची माहिती मिळाल्याने व ती रक्कम मिळण्याच्या आशेने त्यांची दोघांनी हत्या करुन मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावल्याच्या आरोपाखाली जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment