चोरीच्या सहा मोटर सायकलींसह चोरट्यास अटक

On: September 9, 2024 8:37 PM

जळगाव : चोरीच्या सहा मोटरसायकलीसह चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने अटक केली आहे. दिपक सुमाऱ्या बारेला (रा. कर्जाणा ता. चोपडा) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. चोपडा तालुक्यातील कर्जाणा गावाचे बाहेर मेलाणे गावाजवळ त्यास शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेत अटक केली. 

पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील हे.कॉ. संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकुर आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे दोन तसेच पारोळा, मोहाडी ता. धुळे, धरणगाव व राजपुर जि. बडवाणी मध्य प्रदेश येथे दाखल असलेले प्रत्येकी एक असे एकुण सहा मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास कामी दिपक बारेला यास पाचोरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment