चोरीच्या बारा मोबाईल टॉवर बॅट-यांसह चोरटे जेरबंद 

On: September 16, 2024 8:26 PM

जळगाव : मोबाईल टॉवरच्या चोरी केलेल्या बारा बॅट-यांसह दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. अटकेतील दोघा चोरट्यांचा एक साथीदार फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. भिकन पाटील व धर्मेंद्र पाटील (दोघे रा. मंगरुळ ता. अमळनेर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. अकरम अली कमरअली (रा. गांधीपुरा अमळनेर) हा फरार आहे.

अटकेतील दोघांकडून चोरी केलेल्या मोबाईल टॉवरच्या बारा बॅट-या आणि गुन्ह्यात वापरलेले माल वाहतुकीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. भिकन युवराज पाटील हा पुर्वी मोबाईल टॉवर टेक्नीशियनचे काम करत होता. तसेच तो बॅटरी चोरी करतांना त्याचे यापुर्वीच्या कंपनीचे ओळखपत्र वापरुन चोरी करत होता. त्यामुळे त्यांच्यावर कुणी संशय घेत नव्हते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनिरी दत्तात्रय पोटे, हे.कॉ. संदिप पाटील, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बेसाणे, विलास गायकवाड, भारत पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. मारवाड पोलीस स्टेशनला दाखल मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. अटकेतील दोघांना पुढील तपासकामी मारवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment