दोघा चोरट्यांकडून तीन मोटरसायकली हस्तगत

On: October 4, 2024 4:50 PM

जळगाव : दोघा चोरट्यांकडून चोरीच्या तीन मोटरसायकली एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. पवन उर्फ भांजे गणेश पाटील आणि निखील जयराम पाटील (दोन्ही इंदिरानगर कुसुंबा – जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा मोटरसायकल चोरट्यांची नावे आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनसह जळगाव आणि भुसावळ येथील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, पोकॉ नितीन ठाकुर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललीत नारखेडे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment