रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरट्यास अटक 

जळगाव : रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आणि धरणगाव येथील रहिवासी असलेल्या अट्टल मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. 

अटकेतील वैभव चौधरी यांच्याविरुद्ध यापुर्वी धरणगाव आणि धुळे येथील पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. धरणगाव शहरातील कोट बाजार परिसरात राहणारे जहीर आलम शकील अहमद यांच्या घराच्या अंगणातून मोटरसायकल व मोबाईलची 4 ऑक्टोबर रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी 6 ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोटरसायकल चोरन नेताना काही लोकांनी वैभव चौधरी यास पाहिले होते. 

त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वैभवच्या मागावर होते. मात्र तो मिळून येत नव्हता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. जितेंद्र पाटील, दीपक मंlळी, रवींद्र पाटील असे सर्वजण धरणगाव तालुक्यातील फायरिंगच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात मग्न असतांनाच  या गुन्ह्याचा देखील तपास लागला. अटकेतील वैभव चौधरी यास पुढील तपासकामी धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल महेंद्र बागुल करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here