हातात तलवार घेऊन फिरणा-या टिपूची कारागृहात रवानगी

On: October 20, 2024 12:11 PM

जळगाव : हातात तलवार घेऊन दहशत माजवणा-या पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. टिपु उर्फ बहि-या सलीम शेख असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. 

जळगाव शहरातील मेहरुण परिसरात रिलायन्स पेट्रोल पंपा नजीक टिपू हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे 19 ऑक्टोबरच्या दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांनी आपले शोध पथक टिपू यास ताब्यात घेण्या कामी रवाना केले होते. 

पोउनि शरद बागल, पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर, योगेश बारी, गणेश ठाकरे, साईनाथ मुंढे, नरेंद्र मोरे आदींनी त्यास अटक केली. अटकेतील टिपू विरुद्ध यापूर्वी सात गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. न्यायमूर्ती श्रीमती बढे यांच्या आदेशाने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment