खडी तयार करण्याची मशीन चोरी करणाऱ्यास अटक

On: October 22, 2024 3:11 PM

जळगाव : खडी तयार करण्याची मशीन तसेच प्रिंटर मशीनची चोरी करणाऱ्या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातून अटक केली आहे. गोलू बाबूलाल राजपुत असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला 647/2024 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल होता. 

या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस निरीक्षक  दत्तात्रय निकम यांनी शोध पथकाची निर्मिती केली होती. पो. हे कॉ रामकृष्ण पाटील, पो. कॉ योगेश घुगे, पो. कॉ ललीत नारखेडे आदींचा या पथकात समावेश करण्यात आला होते. तापासकामी हे पथक भोपाळ येथे रवाना झाले होते. मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील आरोपीच्या गावापासून सुमारे 50 किलोमीटर लांब असलेल्या रामपुर येथून त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. 

न्यायमूर्ती जे एस मोरे यांच्या न्यायालयात त्यास हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्हयात चोरी झालेली मशीन व प्रिंटर असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गोलू राजपूत याची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment