वाहनात घरगुती गॅस भरतांना स्फोट – दहा जखमी

On: November 5, 2024 9:01 PM

जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात पोलिस चौकीनजीक आज 5 नोव्हेंबर रोजी मंगळवारी दुपारच्या वेळी वाहनात घरगुती गॅस भरतांना अचानक स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत जवळपास दहा जण गंभीर जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याच परिसरात गेल्या काही वर्षांपूर्वी चारचाकी वाहनाच्या वातानुकूलित यंत्रणेत गॅस भरातांना स्फोट झाला होता. या परिसरात अशा स्वरूपाच्या घटना घडत असतात.

चारचाकी वाहनात गॅस भरला जात असतांना वाहनात बसलेल्या कुटुंबातील सदस्यांसह कारचालक संदीप शेजवळ,  दानिष अनिस शेख, शेजारचा दुकानदार आरीफ अब्दुल शेख अशा तिघा जखमींना तातडीने उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील एकाच परिवारातील भरत सोमनाथ दालवाले, देवेश भरत दालवाले, सूरज भरत दालवाले, प्रतिभा भरत दालवाले, हेमा दालवाले, संजय दालवाले,  लक्ष्मी संजय दालवाले असे सर्वजण भाजले गेले आहेत. बुलेट, चारचाकी वाहन, गॅस भरण्याचे दुकान आणि टायरचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment