गोळीबाराच्या घटनेने हादरले जळगाव शहर

On: November 18, 2024 10:58 AM

जळगाव : जळगाव शहर मतदार संघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने जळगाव शहरात खळबळ माजली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे देखील अशाच स्वरुपाची घटना घडली होती. वारंवार होणा-या गोळीबारीच्या घटनांनी जळगाव शहर आणि जिल्हयात चिंतेचे वातावरण झाले आहे. निर्भय वातावरणात प्रचार आणि निवडणूक व्हावी अशी सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सामान्य निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. रेड्डी आज पहाटेच घटनास्थळी दाखल झाले.  जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञाताकडून पहाटे चार वाजता गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.  . या घटनेची सखोल चौकशी होत आहे.       

अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन हे पहाटेच्या वेळी साखरेझोपेत असतांना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि तपासणी केल्यावर त्यांना दिसले की काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाला आहे आणि गोळ्यांचे छिद्र सापडले आहेत.

या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रस्त्यावर तीन रिकामी काडतुसे पोलिसांना आढळून आली. झडतीदरम्यान खोलीत एक गोळी सापडली. शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे एआयएमआयएम चे जिल्हाध्यक्ष आहेत. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या घटनेबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतला जात असून पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ एक मोटारसायकल आढळून आली. पुढील तपास सुरु आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment