गुटखा विक्री आणि वाहतुक करणारा जेरबंद

On: November 18, 2024 4:46 PM

जळगाव : मानवी आरोग्यास अपायकारक गुटख्याची विक्री आणि त्याची वाहतुक करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. शुभम नरेशकुमार हंडी असे मुद्देमालासह अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून 2 लाख 74 हजार164 रुपये किमतीचा विविध प्रकारचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शुभम हंडी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतुल रघुनाथ वंजारी, सफौ रवी पंढरीनाथ नरवाडे,  सफौ संजय हिवरकर, पोहेकॉ हरीलाल पाटील, पोहेकॉ राजेश बाबाराव मेढे, पोहेकॉ विजय दामोदर पाटील, पोहेकॉ अक्रम याकुब शेख, पो.कॉ. प्रदीप चवरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील शुभम यास एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment