चोरीच्या तीन मोटरसायकली हस्तगत – चोरट्यास अटक

On: November 25, 2024 3:56 PM

जळगाव : चोरीच्या तीन मोटरसायकलींसह चोरट्यास अटक करण्यात आली आहे. जिल्हा पेठ, जळगाव तालुका आणि रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. शोएब हबीब शहा असे अटक करण्यात आलेल्या मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे. 

मोटर सायकल चोरीचा एक गुन्हा रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे शोएब शहा यास अटक करण्यात आली. चौकशी व तपासाअंती त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. यापैकी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दाखल व उघडकीस आलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल हेमंत कळसकर करत आहेत. 

रामानंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, पोहेकॉ इरफान मलिक, पोहेकॉ सुशिल चौधरी, पोहेकॉ जितेंद्र राजपुत, पोहेकॉ जितेंद्र राठोड, पोहेकॉ जितेंद्र  तावडे, पो.ना. हेमंत कळसकर, पो.ना. रेवानंद साळुखे, पो.ना. विनोंद सूर्यवंशी, पो.शि. रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment