पिस्टलच्या बळावर दहशत माजवणा-यास अटक

On: December 24, 2024 10:54 AM

जळगाव : पिस्टलच्या बळावर दहशत माजवणा-यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सुप्रिम कॉलनी परिसरातील रहिवासी असलेला शुभम अनंता राऊत असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अटकेतील शुभम राऊत याने त्याचा मित्र बंटी तायडे याच्याकडे देखील एक पिस्टल दिली असल्याचे त्याने कबुल केले.

बंटीचा शोध घेतला असता तो घरी आढळून आला नाही. मात्र घरझडतीत त्याच्या घरात एक गावठी बनावटीचे पिस्टल आढळून आले. ते पिस्टल जप्त करण्यात आले असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे.

एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पो.उप.निरी चंद्रकांत धनके, पो. काँ छगन तायडे पो.शि. गणेश ठाकरे, पो.शि. शिद्धेश्वर डापकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्हयाचा पुढील तपास पो.उप. निरी. चद्रकांत धनके व पो. काँ योगेश घुगे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment