विज चोरी रोखण्यासाठी आता ‘मल्टी मीटर बॉक्स’

On: January 28, 2025 11:38 AM

जळगाव : जळगाव जिल्ह्यात ज्या भागात विज चोरीचे प्रमाण जास्त आहे त्या भागातील विज चोरीचे प्रकार रोखण्यासाठी आता महावितरणकडून मल्टी मिटर बॉक्स खांबावर बसवले जाणार आहेत. महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय आँढेकर आणि मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव विभागात ही मोहीम राबवली जात आहे.

ज्या भागात मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरीचे प्रकार होतात त्या भागातील विज ग्राहकांच्या घरावरील मीटर काढून ते वीज खांबावर एका पेटीत बसवले जातील. या मल्टीमीटर बॉक्समधून ग्राहकांना वीज पुरवठा केला जाणार आहे. महावितरण कर्मचा-यांसह रिडींग घेणारे कर्मचारी हा बॉक्स उघडतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment