सहकाऱ्यांच्या त्रासाला वैतागून कर्मचा-याची आत्महत्या

On: January 29, 2025 8:40 AM

जळगाव : कार्यालयीन सहका-यांच्या जाचाला वैतागून कर्मचा-याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात घडली. अनिल हरी बडगुजर असे पंचायत समिती डीआरडीए कार्यालयातील आत्महत्या करणा-या कर्मचा-याचे नाव आहे.

मृत्युपुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ती आई, वडील व भावाच्या मोबाईलवर पाठवली. त्यात त्यांनी कार्यालयीन कर्मचा-यांच्या त्रासाचा उल्लेख केला आहे. 27 जानेवारीच्या रात्री हा प्रकार वाघ नगरात घडला.

अनिल बडगुजर यांना कार्यालयातील एका महिला सहका-याकडून काही वर्षापासून विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात होती. त्यांच्या विरुद्ध स्थानिक समिती मधे तक्रार देखील करण्यात आली होती. या प्रकाराला वैतागून त्यांनी हे टोकाचे  पाऊल उचलले. या घटने प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment