कंगनाच्या कार्यालयावर पडणार हातोडा ; तगडा बंदोबस्त

On: September 9, 2020 11:31 AM

मुंबई : काल मंगळवारच्या दिवशी महापालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिल येथील निवासस्थानाबाहेर नोटीस डकवली होती. आज तिच्या कथीत कार्यालयावर कारवाई होण्याची शक्यता दिसून येत आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कंगनाच्या कथित कार्यालयाबाहेर हजर आहेत. त्यांच्यासमवेत पोलिसदेखील हजर आहेत. त्यामुळे लवकरच कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता दिसून येत आहे.

कंगनाच्या निवासस्थानी कार्यालयाचे अवैध बांधकाम करण्यात आले असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर केल्याचे त्या नोटीस मधे नमुद केले आहे. अधिनियम ३५४ अ अंतर्गत ही नोटीस बजावण्यत आली होती. या नोटिसची मुदत २४ तास एवढी होती. ती मुदत आज सकाळी साडे दहा वाजता संपुष्टात आली आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेचे अधिकारी कारवाईला सुरुवात करण्यची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment