घराचा कडीकोंडा तोडून चोरी करणारे दोघे जेरबंद

On: April 2, 2025 10:48 PM

जळगाव : जळगाव शहरातील रामनगर भागातील राहत्या घराचा कडी कोंडा तोडून सोन्याचे दागिने चोरी करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक आणि त्याचा साथीदार समीर उर्फ तात्या शेख सलीम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

जळगाव शहरातील रामनगर भागातील ऋषीकेश दिलीप येवले यांचे घर 15 ते 17 मार्च या कालावधीत बंद होते. या कालावधीत त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.  

या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे, सहायक फौजदार अतुल वंजारी, राजेश मेढे, रवी नरवाडे, पोहेकॉ प्रविण भालेराव, विजय पाटील, हरीलाल पाटील, महेश पाटील, सागर पाटील, चालक प्रमोद ठाकुर आदींनी अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक यास उमर कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले. त्याने आपला गुन्हा कबुल करत त्याचा साथीदार समीर उर्फ तात्या शेख सलीम याचा देखील सहभाग असल्याचे कबुल केले.

दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 20 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. अटकेतील दोघांना पुढील कारवाईकामी रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटकेतील अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक याच्याविरुद्ध यापुर्वी चार गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. जितेंद्र राठोड करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment