पेन्शनधारकांना केंद्राचा दिलासा – हयातीच्या दाखल्याची वाढवली मुदत

On: September 12, 2020 1:09 PM

नवी दिल्ली : पेन्शनधारकांना दिलासादायक वृत्त केंद्र सरकारने दिले आहे. जीवन प्रमाणपत्र अर्थात हयातीचा दाखला जमा करण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत सरकारने वाढवली आहे. दरवर्षी पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन सुरु ठेवण्यासाठी 30 नोव्हेंबरच्या आत लाइफ सर्टिफिकेट संबंधीत बॅंकेत जमा करावे लागते. मात्र सरकारने ही तारीख आता वाढवून दिली असून ती 31 डिसेंबर पर्यंत केली आहे. पेन्शनधारक हयात असल्याचा पुरावा म्हणून लाइफ सर्टिफिकेटअर्थात हयातीचा दाखला द्यावा लागतो. तो दाखला दिला नाही तर पेंशनधारकास त्याची पेन्शन मिळणे बंद होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment