लोखंडी कोयत्यासह दहशत माजवणा-यास अटक

On: May 5, 2025 8:39 PM

जळगाव : हातात लोखंडी कोयता घेऊन फिरणा-या तरुणास चाळीसगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. दादाभाऊ वाल्मिक अहिरे असे रमाबाई आंबेडकर नगरातील अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.

अटकेतील दादाभाऊ अहिरे याच्याविरुद्ध शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) सह 135 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्य मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अजय अशोक पाटील व पोना भुषण मांगो पाटील यांनी केलेल्या या कारवाईचा पुढील तपास हे.कॉ. पंकज पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment