जळगाव : पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे या गावी 85 वर्ष वयाच्या वयोवृद्ध महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्या केल्याची घंटा उघडकीस आली आहे. 5 जूनच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. जनाबाई महारु पाटील खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
मयत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील सोन्याच्या बाळ्या ओरबाडून हल्लेखोरांनी पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. सोन्याची पोत आणि सोन्याच्या बाळ्यांसाठी चोरट्यांनी जनाबाई पाटील या महिलेचा खून केल्याचे या घटनेवरुन लक्षात येते.
मृत जनाबाई या एकट्याच शेवाळे या गावी रहात होत्या. त्यांचा मुलगा त्यांच्या शेजारी राहतो. त्यांचा शेजारी राहणारा मुलगा कृष्णराव पाटील हा मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे गेल्याची संधी साधून अज्ञात हल्लेखोर चोरट्यांनी डाव साधला. जनाबाई पाटील यांची हत्या केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मृतदेह पलंगाखाली टाकून त्यावर पांघरुण टाकून झाकला होता. पिंपळगाव हरेश्वर पोलिस पुढील तपास करत आहेत.







