निरंकारी सत्संग भवनात भक्तांची पर्यावरण संवर्धनासाठी प्रतिज्ञा

On: June 15, 2025 8:14 PM

जळगाव दि.१५ प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ या थीमवर शिरसोली रोडवरील संत निरंकारी सत्संग भवनात कापडी पिशवी वाटप करण्यात आले. प्लास्टिक वापरामुळे होत असलेले दुष्परिणामाची जाणिव ठेऊन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिज्ञा सर्वांनी केली. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी यांनी प्रतिज्ञा दिली.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चे जळगाव विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री करणसिंग राजपूत यांनी कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर कसा होईल याबाबतचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्र अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन, विक्रम अस्वार, सुधीर पाटील, जळगाव येथील निरंकारी सस्तंग भवनाचे महात्मा रमेश कुमार आहुजा, राजकुमार वाणी, जळगाव शाखेचे सेवादल संचालक गंगाधर जोशी, व्ही एस निकम सर्व सेवादलाचे अधिकारी, महात्मा बहने सोबत साधसत्संग चे महात्मा बंधु व भगिनींसह सुमारे ५०० जणांचा सहभाग होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment