चोरीच्या नऊ मोटार सायकली हस्तगत 

On: November 23, 2026 6:22 PM

जळगाव – मोटार सायकली चोरी करणाऱ्या चोरट्यास एलसीबी आणि जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून चोरीच्या नऊ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. गोकुळ साहेबराव पाटील (रा. बोरसर जिल्हा बुरहानपूर मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. 2 लाख 32 हजार 500 रुपये किमतीच्या या नऊ मोटार सायकली आहेत. जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल सात आणि जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला दाखल दोन असे एकुण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. 

मोटार सायकली चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या मदतीने हे गुन्हे उघडकीस आले आहेत. जळगाव शहरातून अजून आठ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली अटकेतील चोरट्याने दिली आहे. त्यामुळे मोटार सायकल चोरीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वात एलसीबीचे पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, प्रदीप सपकाळे, विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, छगन तायडे, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, रिजवान शेख, जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोहेकॉ विरेंद्र शिंदे, सतीष पाटील, अमोल ठाकुर, प्रणय पवार आणि बाजार पेठ पोलिस स्टेशनचे पो कॉ कुंदनसिंग बयास, मुबारक देशमुख, विकास पवार, हर्षल महाजन, गौरव पाटील, मिलींद जाधव आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment