वेश्याव्यवसायाचे “मनमंदीर” अडकले पोलिस कारवाईत

On: June 20, 2025 3:36 PM

जळगाव : “मनमंदीर” नावाच्या लॉज व परमीट रुम बार मधे सुरु असलेला कुंटणखाना यावल पोलिसांच्या कायदेशीर कारवाईत अडकला. या लॉजमधे लपून छपून सुरु असलेला वेश्या व्यवसाय यावल पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत तिघा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास या लॉजमध्ये बनावट ग्राहकांच्या माध्यमातून झालेल्या कारवाईने परिसरात खळबळ माजली आहे.

गोपाळ निंबा पाटील (रा. दहिगाव ता. यावल), पराग प्रकाश लोहार (खेडी – जळगाव), समाधान शालीक तावडे (रा.साकळी ता. यावल) अशी कारवाई करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यावल तालुक्यातील या वेश्या व्यवसायाची कुणकुण परिसरातील आंबट शौकिनांना लागली होती. लपून छपून सुरु असलेल्या या व्यवसायामुळे आंबट शौकीन ग्राहकांसह भाडे तत्वावर लॉज चालवण्यास घेणारा व्यावसायीक अशा दोघांची सोय झाली होती. शौकिनांना सुख आणि लॉज व्यावसायीकास आर्थिक मोबदला मिळत होता.

गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने या लॉजवरील कारवाईचा सापळा रचला. बनावट ग्राहक आणि पंच अशा दोघांसह पोलिस पथकाच्या मदतीने ही कारवाई पूर्ण करण्यात आली. या कारवाईत एक महिला आढळून आली. किनगाव येथील लॉज मालकाने ही लॉज भाडे तत्वावर चालवण्यास दिली होती असे समजते. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. वासुदेव मराठे, पो.ना. अमीत तडवी, पो. कॉ. सागर कोळी, पो.कॉ. एजाज गवळी, पो.कॉ. भरत कोळी, म.पो.कॉ. मिनाक्षी तडवी, अल्लाऊद्यीन तडवी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment