जळगाव पोलिस दलात दुय्यम निरीक्षकांच्या बदल्या

On: June 25, 2025 10:22 AM

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलातील 19 अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. सहा सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि तेरा पोलिस उप निरीक्षकांच्या या फेरबदलात समावेश आहे. चार अधिकाऱ्यांच्या विनंतीवरुन बदल्या करण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय बदल्या झालेल्या अधिका-यांची नावे पुढीलप्रमाणे असून कंसात पुर्वीचे ठिकाण आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे (यवतमाळ) – यावल, संजय निकुंभ (पुणे शहर) – पाचोरा, नितीन पाटील (नाशिक) – भुसावळ बाजारपेठ.

बदली झालेले सहायक पोलिस उप निरीक्षक पुढीलप्रमाणे – गणेश (नियंत्रण कक्ष) – आर्थिक गुन्हे शाखा, योगीता नारखेडे (मानव संसाधन विकास विभाग) – एएचटीयू.
बदली झालेले पोलिस उप निरीक्षक पुढीलप्रमाणे – अशोक खेडकर (गोंदिया) – जळगाव शहर, अविनाश राठोड (रायगड) – रावेर, शांताराम देशमुख (जिल्हापेठ) – पाचोरा, सुनील मोरे (यावल) – रावेर, समाधान गायकवाड (उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे वाचक) – अमळनेर

मुदतवाढ मिळालेले अधिकारी पुढीलप्रमाणे – कुणाल चव्हाण (चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन), योगेश गणगे (पाचोरा), सुनील चौधरी (वाचक – अप्पर पोलिस अधीक्षक), मकसुद शेख (तक्रार अर्ज शाखा), प्रिया दातीर (शनी पेठ).

विनंती बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे – नंदकिशोर काळे (भुसावळ तालुका) – मुक्ताईनगर, मंगेश बेंडकोळी (भुसावळ बाजारपेठ) – वरणगाव, जितेंद्र वल्टे (चोपडा शहर) – स्थानिक गुन्हे शाखा सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे (मुक्ताईनगर) – भुसावळ तालुका.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment