कार चालक महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा

On: June 26, 2025 11:31 AM

जळगाव : भरधाव कारच्या धडकेत अडीच वर्षांची बालिका जखमी झाल्याप्रकरणी महिला डॉक्टर विरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर – जळगाव दरम्यान महामार्गावर 3 जून रोजी भरधाव कारच्या धडकेत अडीच वर्षांच्या बालिकेसह तिची आई गंभीर जखमी झाली होती. या घटनेप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. मिताली गालेचा यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ विभागात सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोड व त्यांच्या पत्नी सहायक प्राध्यापक डॉ. मिताली गालेचा हे पती-पत्नी 3 जून रोजी जालना येथून कारने जळगावला येत होते. वाटेत पहुर नजीक ज्योती गोपाल बोडखे (23) व भाविका गोपाल बोडखे (अडीच वर्ष ) या मायलेकींना त्यांच्या कारची धडक बसली होती. या अपघातात बालिका भाविका गंभीर जखमी झाली. तिची आई ज्योती गोपाल बोडखे हिच्या फिर्यादीनुसार डॉ. मिताली गालेचा यांच्याविरुद्ध पहूर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार रवींद्र देशमुख करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment