साग व्यापा-याकडून लाच – दोघा वनपालांविरुद्ध गुन्हा

On: July 2, 2025 10:03 PM

जळगाव : सागाची झाडे तोडण्याची परवानगी मागणा-या व्यापा-याकडून आठ हजार रुपयांची लाच घेणा-या आणि ती लाच मागणी करण्यास सांगणा-या अशा दोघा वनपालांविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच स्वीकारणारी महिला असून तिला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. पुरुष वनपालास ताब्यात घेण्यात आले आहे. दिलीप भाईदास पाटील आणि वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (वनपरिक्षेत्र कार्यालय पारोळा) अशी दोघांची नावे आहेत.

जळगाव एसीबीचे सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील सहायक फौजदार सुरेश पाटील, महिला पोहेकॉ शैला धनगर, पोहेकॉ किशोर महाजन, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment