घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : विवाहितेचा विविध कारणासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली पती, सासू, सासरे व दोघे अशा एकुण पाच जणांविरुद्ध घाटंजी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहल उर्फ सोनु वैभव मांडळे असे फिर्याद दाखल करणा-या विवाहितेचे नाव आहे. गु. र. न. 573/25 भारतीय न्याय संहिता 85, 3, (5) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव मांडळे (पती), माधव मांडळे (सासरे), छाया मांडळे (सासू), मुग्धा पाचकवडे व राहुल पाचकवडे (रा. नागपूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व छळ केल्याचा आरोप असलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विनोद मेश्राम करत आहेत.







