प्रसुती रजा मंजुरीसाठी लाच – मुख्याध्यापिका, लिपीक एसीबीच्या सापळ्यात

On: July 7, 2025 10:04 PM

जळगाव : प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणारी मुख्याध्यापिका आणि लिपिक असे दोघे एसीबीच्या सापळ्यात रंगेहात सापडले आहेत. जळगाव जिल्ह्याच्या खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळाच्या धनाजी नाना विद्यालयात हा प्रकार घडला आहे. सौ. मनीषा पितांबर महाजन (मुख्याध्यापिका) आणि आशीष यशवंत पाटील (लिपिक) असे दोघा लाचखोरांचे नाव आहे.

या शाळेतील कायमस्वरुपी महिला उप शिक्षिकेला प्रसुती रजा हवी होती. त्यासाठी या शिक्षिकेने रितसर वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज सास-यांच्या मार्फत मुख्याध्यापिका सौ. मनीषा महाजन यांच्याकडे दिला होता. मात्र प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना पाच हजार रुपये प्रमाणे सहा महिन्यांच्या रजा मंजुरीसाठी एकुण तीस हजार रुपयांची लाच शिक्षिकेच्या सास-यांकडे मागण्यात आली.

या प्रकरणी आलेल्या तक्रार अर्जाची धुळे एसीबी पथकाने पडताळणी केली असता दरमहा सहा हजार रुपये याप्रमाणे 36 हजार रुपयांची लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले. मुख्याध्यापिका सौ. महाजन यांनी स्वीकारलेली लाचेची रक्कम लिपिक आशीष पाटील यास मोजण्यास दिली. तो रक्कम मोजत असतांना एसीबी पथकाने छापा टाकून पुढील कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment