पांढरकवडा येथे परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बंसल 

On: July 9, 2025 9:46 PM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राज्यातील अनेक परिविक्षाधीन आयपीएस (IPS) अधिका-यांच्या बदल्या गृह विभागाने केल्या असून पांढरकवडा येथे परिविक्षाधीन (IPS) राॅबीन बन्सल यांची उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. 

जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षण (DTP) व सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैद्राबाद येथील प्रशिक्षण पूर्ण करुन महाराष्ट्र संवर्गात रुजू होणाऱ्या खालील तक्त्यातील संदर्भ (२) मध्ये नमूद ७६RR मधील परिविक्षाधीन (IPC) अधिकारी (Direct Recruit) यांची, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न मधील तरतुदीनुसार, सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने, स्तंभ (३) मध्ये निर्दिष्ट पदावर या द्वारे पदस्थापना करण्यात येत आहे. 

परिविक्षाधीन IPS राॅबीन बन्सल, उप विभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा (जिल्हा यवतमाळ), अनिकेत हिरडे, उप विभागीय पोलीस अधिकारी धानोरा (जिल्हा गडचिरोली), निखील पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी अकोट (जिल्हा अकोला), सिद्धार्थ बरवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी मालेगांव शहर (जिल्हा नाशिक), प्रशांत डगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी चिमूर (जिल्हा चंद्रपूर), मयंक माधव, उप विभागीय पोलीस अधिकारी तुमसर (जिल्हा भंडारा), अपराजित अग्निहोत्री, उप विभागीय पोलीस अधिकारी कन्नड (जिल्हा छत्रपती संभाजीनगर), ऋषिकेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी आंबेजोगाई (जिल्हा बीड), अंजना क्रिष्णा व्ही. एस., करमाळा (जिल्हा सोलापूर) व सागर खर्डे, उप विभागीय पोलीस अधिकारी सावनेर (जिल्हा नागपूर) आदींची बदली करण्यात आली आहे. 

सदरचा शासन आदेश हा आस्थापना मंडळ १ च्या शिफारशींचा यथायोग्य विचार करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आला आहे. तसेच रा. पो. से. उप विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पांडुरंग गोफणे, विजयकुमार ठाकूरवाड, रामेश्वर व्यंजने, अनिल चोरमले व अजित पाटील यांची या द्वारे बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्र पणे निर्गमित करण्यात येतील, असे गृह विभागाने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment