चोरीच्या दोन चारचाकी मध्य परदेशातून हस्तगत

On: July 9, 2025 8:52 PM

जळगाव : अमळनेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातून चोरीची दोन चारचाकी वाहने जप्त केली आहे. अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल एका कार चोरीच्या तपासकामी पोलिस पथक मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्हयात गेले होते. या तपासादरम्यान चोरीच्या दोन कार चोरट्याच्या गोडाऊन मध्ये आढळून आल्या. यातील एक कार नागपूर शहरातील राणाप्रताप नगर पोलीस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आहे. दुसरे चार चाकी वाहन जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आहे.

पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार शरद बागल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अमळनेर पोलीस स्टेशनच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक नामदेव बोरकर, कर्मचारी विनोद किरण संदानशिव, निलेश सुभाष मोरे, प्रशांत विजय पाटील, उज्वलकुमार बुधा म्हस्के आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment