जळगाव : जळगाव शहरातील महाबळ रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल रॉयल पॅलेसमधे सुरु असलेल्या जुगाराच्या खेळावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. या हॉटेल मधील रुम नंबर 209 मधे मदन लुल्ला या नावाने आरक्षित केलेल्या रुम मधे तीन पत्ती (झन्ना मन्ना) हा जुगाराचा खेळ सुरु होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री करुन ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईत आठ इसमांकडून एकुण 19 लाख 97 हजार रुपये रोख व वेगवेगळया कपंनीचे 13 मोबाईल हॅन्डसेट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून रामानंद नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील उप निरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम याकुब शेख, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.हे.कॉ. प्रविण भालेराव, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.ना. किशोर राजाराम पाटील, पो. कॉ. रविंद्र श्रावण कापडणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.







