भोंदूच्या स्वाधीन होण्यासाठी उच्चशिक्षित पतीचे पत्नीवर दडपण

On: July 14, 2025 4:27 PM

नाशिक : मुलबाळ होत नसल्यामुळे भोंदू बाबाला घरी आणून त्याची सेवा करण्यासाठी उच्च शिक्षित पतीने उच्च शिक्षित पत्नीवर दडपण टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यातच हा प्रकार समोर आल्याने विवाहीतेने पतीचे घर सोडून पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय न्यायालयात धाव घेत लग्नात झालेल्या खर्चाची मागणी करत पती विरुद्ध दावा दाखल केला आहे.

नाशिक शहरात राहणारी ही उच्च शिक्षित विवाहिता सधन परिवारातील असून तिचे वडील शासकीय सेवेत आहेत. त्यांनी आपल्या मुलीचे लग्न फार्मसी कंपनीत उच्च पदावर नोकरी करणा-या तरुणासोबत लावून दिले. मात्र काही दिवसातच या विवाहीतेचे स्वप्न भंग पावले. तो मूल जन्माला घालण्यास सक्षम नसल्याचे तिला समजले.

तिने त्याला वैद्यकीय उपचार घेण्यास सांगितले. मात्र त्याने टाळाटाळ केली. मोठ्या पगाराची पत्नी आपल्याला सोडून जावू नये त्याने त्याच्या आईच्या मदतीने तिच्याविरुद्ध काळी जादू करण्याचा कट रचला. धागा आणि तावीज घालण्यासह विविध अघोरी कृत्य सुरु झाल्याचे बघून तिने पती आणि सासूला जाब विचारत वडिलांना सासरी बोलावून घेतले. तिने भोंदू बाबाला हाकलून लावत पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

पत्नीला वश केल्यास आणि मूल झाल्यानंतर ती सोडून जाणार नाही या उद्देशाने या पतीने भोंदूबाबाला घरी आणले. बाबाची सेवा केल्याने घराचे शुद्धीकरण होईल. माझ्यातील दोष निघून जाईल, असे सांगून त्याने पत्नीला भोंदूबाबाची सेवा करण्यास सांगितले. आठ महिन्यातच लग्न मोडल्याने झालेले आर्थिक नुकसान झाल्याने तिने पती विरुद्ध न्यायालयात दाद मागीतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment