नाशिक : आपल्या दोघा चिमुकल्यांसह विवाहिता बेपत्ता झाल्याप्रकरणी सटाणा पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली आहे. सुवर्णा सोमनाथ जाधव असे दोघा मुलांसह बेपत्ता झालेल्या 27 वर्षाच्या विवाहीतेचे नाव आहे. मालेगाव तालुक्यातील साकुर येथील माहेरवाशीन सुवर्णा जाधव ही विवाहीता आपल्या पती व मुलांसह सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथे रहात होती.
9 जुलैच्या दुपारपासून ती सात वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा यांच्यासह बेपत्ता झाली आहे. तिच्या नातेवाईकांनी तिघांचा शोध घेतला. मात्र ते कुठेही आढळले नाहीत. सटाणा पोलिस तपास करत आहेत.







