लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांतून पत्नीच्या प्रियकराचा खून

On: September 14, 2020 4:17 PM

पिंपरी : पत्नीचे लग्नापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून पतीने पत्नीच्या प्रियकरावर कोयत्याने वार केल्याची घटना पुणे येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ व्यंकट जाधव (२८) संजय नगर, औंध असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. आयाज शेख (रा. शिवाजीनगर, पुणे) आणि सोन्या बाराथे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुशांत व्यंकट जाधव (संजयनगर, औंध) यांनी सांगवी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

आरोपी आयाज याच्या पत्नीचे लग्नापूर्वी सौरभ जाधव या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याचा राग मनात असल्यामुळे आरोपी आयाज याने त्याचा साथीदार सोन्या बाराथे यांच्या मदतीने सौरभ जाधव याच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment