तिन लाखांचा गुटखा जप्त – दोघांविरुद्ध गुन्हा

On: July 21, 2025 6:51 PM

यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या गुटख्याची वाहतूक करणा-या वाहनास अडवून तिन लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. घाटंजीकडून यवतमाळच्या दिशेने जाणारे वाहन वडगांव पोलिसांनी कोळंबी फाट्यावर अडवून रात्र गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी एस. आर. सुरकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे संशयित आरोपी रमेश सुरेश वाघाडे व आलोक महेश यादव (दोघे रा. यवतमाळ)  यांच्या विरुद्ध वडगांव जंगल पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिस निरीक्षक विकास दांडे यांनी केलेल्या या कारवाईत विविध तंबाखूजन्य उत्पादनाचा 1 लाख 94 हजार 417 रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आला आहे. याशिवाय वाळू तस्करी, हातभट्टी, आदींविरुद्ध वडगाव पोलिसांनी कारवाया सुरु ठेवल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment