आठ किलो गांजासह दोघांना अटक

On: July 21, 2025 7:25 PM

जळगाव : आठ किलो 130 ग्रॅम वजनाच्या गांजासह तो वाहतूक करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने गावक-यांच्या मदतीने जेरबंद केले आहे. उदयभान संजय पाटील आणी योगेश रामचंद्र महाजन (दोघे रा. अडावद ता. चोपडा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

20 जुलै च्या रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे हेकॉ रविंद्र पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या कारवाईला मुर्त स्वरुप देण्यात आले. गलंगी गावाकडुन चोपडा शहराच्या दिशेने दोघे गांजाची वाहतुक करत असतांना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करण्यात आला. दोघांच्या ताब्यातील वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे चोपडा शहरात गावक-यांच्या मदतीने एकाला पकडण्यात आले. पळून जाणा-या दुस-याला पोलिस उप निरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी पकडले.

दोघांकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, 1 लाख 21 हजार 950 रुपये किमतीचा गांजा, दोन मोबाईल असा एकुण 2 लाख 62 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय जितेंद्र वल्टे, हेकॉ विष्णु बिऱ्हाडे, रवी पाटील, दिपक माळी, विलेश सोनवणे, चालक दिपक चौधरी, चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोकॉ मदन पावरा, महेंद्र पाटील, अतुल मोरे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास चोपडा शहर पोलिस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment