मुंबई : हनी ट्रॅपमधे अडकलेल्या 72 जणांची नावे कुणाकुणाची आहेत याची उत्सुकता महाराष्ट्रासह देशातील जनतेला लागली आहेत. या पार्श्वभुमीवर “त्या” होमगार्ड महिलेकडून ब्लॅकमेल केले जात असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र आता त्या होमगार्ड महिलेनेच करुणा शर्मा यांच्यासह पत्रकार परिषद घेत दोघांची फोटोसह नावे जाहीर करुन खळबळ उडवून दिली आहे. आपल्यासोबतच आपल्या मुलीवर देखील अत्याचार झाला असल्याचे या होमगार्ड महिलेचा आरोप आहे. रक्षकच भक्षकच झाले असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला.
आपल्याला चहा पिण्याच्या बहाण्याने एसीपी कोळेकर यांनी त्यांच्या घरी बोलावले आणि पाण्यातून गुंगीचे औषध दिले व त्यानंतर दोघांनी अत्याचार केला असा या पिडीत होमगार्ड महिलेने आरोप केला आहे. त्या ठिकाणी कार्ले आडनावाची व्यक्ती देखील हजर होती असे या महिलेचे म्हणणे आहे.
या प्रकरणी कळवा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता आपली तक्रार घेतली नाही असा देखील या महिलेचा आरोप आहे. डिसीपी, सीपी, पोलिस महासंचालक, गृह मंत्री, मुख्यमंत्री महिला आयोग आदी ठिकाणी न्यायासाठी भेट देत अर्ज दिल्याचे या पिडीत महिलेचे म्हणणे आहे. आपल्याला चौकशीकमी नौपाडा विभागाच्या एसीपी प्रिया ढाकणे – डमाळे यांच्याकडे जावूनही उपयोग झाला नसल्याचे होमगार्ड महिलेचे म्हणणे आहे.







