बांगलादेशी तरुणीकडून देहविक्रीचा व्यवसाय उघडकीस

On: July 25, 2025 9:49 AM

जळगाव : नोकरीचे आमिष दाखवत बांगलादेशी तरुणीला  जळगावला आणून तिला देहविक्री करण्यास भाग पाडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत तरुणी आणि ती महिला पोलिसांच्या ताब्यात असून जिल्हापेठ पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीत प्रोफेसर कॉलनी परिसरातील एका घरात हा प्रकार सुरु असल्याची माहिती पुणे येथील एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोलिसांना समजली होती.  

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, रविंद्र कापडणे व महिला पोलीस अंमलदार अश्विनी सावकारे यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोहेकॉ भारती देशमुख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment