यवतमाळ, घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) – गुजरात राज्यात आपली फुस लावून विक्री केल्याची तक्रार विधवा महिलेने आर्णी पोलिस स्टेशनला दिली आहे. विधवा महिला आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आर्णी येथे आली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्णी तालुक्यातील पिडीत महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे.
सुरेश पोपट सवसाणी (हिरापर, ता. टंकारा, जि. मोरबी – गुजरात), संदीप सुभाष सुरदुसे (शास्त्रीनगर, आर्णी), गणेश नामदेव भेनेकर (ग्रीन पार्क, आर्णी), दर्शना गणेश भेनेकर अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. पूजा जितेंद्र पाटीदार व जितेंद्र कैलास पाटिदार (मनावर मध्यप्रदेश) या दोघा फरार संशयीतांचा शोध सुरु आहे. अटकेतील संशयीतांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत देशमुख व सहकारी पुढील तपास करत आहेत.







