नाशिकरोड (प्रतिनिधी) – वेळीच सावध झाला नाहीत, तर आपली कुटुंबसंस्कृती आणि भारतीय विवाहसंस्था धोक्यात येईल असे प्रतिपादन सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी केले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगाव येथील अहिर सुवर्णकार समाजाच्या सभागृहात आयोजित सहविचार बैठकीत समुपदेशन करताना ते बोलत होते. यावेळी समाज बांधव उपस्थित होते.
समाज बांधवांना समुपदेशन करताना ते पुढे म्हणाले की सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठाच्या माध्यमातून भारतीय विवाहसंस्थेला बळकटी देणारा विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणणाऱ्या कृति आराखडा जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी व्यासपीठावर कोपरगाव येथील लाड सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेट भडकवाडे, अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे विश्वस्त अनिलशेट जाधव, माजी अध्यक्ष आणि मार्गदर्शक भाऊसाहेब बागुल, कोपरगाव येथील नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे आदी उपस्थित होते.
सहविचार बैठक सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आला. अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष अविनाश वाघ यांनी प्रास्ताविक केले. लाड सोनार युवक मंडळाचे अध्यक्ष संतोष देवळालीकर यांनी सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांचा परिचय करून देताना सकल भारतीय सोनार समाज संघटन या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, यासाठी सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठाची माहिती दिली. युवा सोनार समाजसेवक उमाकांत बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले.
कोपरगाव येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष अविनाशशेठ वाघ, माजी अध्यक्ष भाऊसाहेब बागुल, सामाजिक कार्यकर्ते योगेशभाऊ बागुल, कोपरगाव येथील लाड सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेट भडकवाडे, लाड सोनार युवक मंडळाचे अध्यक्ष संतोषशेट देवळालीकर, युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांताराम गोपाळशेट दुसाने, दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्य (अकोला) चे अध्यक्ष दिलीपराव महतकर, अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार संस्था महाराष्ट्र प्रांतिक मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर फाकटकर, कोषाध्यक्ष सुरेंद्र खोल, अखिल वैश्य सोनार महासंघाचे महासचिव संदीप भगीरथशेट सराफ, भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भास्करराव मैंद, नाशिक जिल्हा माळवी सोनार समाजचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेरेकर, श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था (महाराष्ट्र राज्य), श्री क्षेत्र त्रंबकेश्वर, जि. नाशिक चे अध्यक्ष दिलीप शेठ शहाणे घोटीकर, हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशन (आर आर बी फाउंडेशन संलग्नित), अमळनेर (जिल्हा जळगाव) चे संस्थापक अध्यक्ष भैयाभाऊ भामरे, नाशिक येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्राचे जिल्हा समन्वयक ॲड. स्वप्निल सुधाकर विसपुते, पुणे येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्रा चे जिल्हा समन्वयक ॲड. जगदीश बी. विसपुते, धुळे येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्राचे जिल्हा समन्वयक ॲड. डॉ राजेंद्र निकुंभ, सहसमन्वयक ॲड. अमित मधुकर दुसाने, सकल भारतीय सोनार समाज संघटनचे ग्रुप ॲडमिन धनंजय कपोते, सुनील माळवे (वावी), पुणे येथील वंशावळी डॉट कॉमचे संस्थापक संचालक विकास शांताराम विसपुते यांनी ही सहविचार बैठक निमंत्रित केली होती.
या सहविचार बैठकीत सोनार समाजातील विवाहविषयक, समस्या, विवाहनिश्चिती, घटस्फोटाचे वाढते प्रमाण, कुटुंबकलह या समस्यांची सामूहिक प्रयत्नांतून सोडवणूक करण्यासाठी भारतीय विवाह संस्थेला बळकटी देणारा हा कृती आराखडा कसा महत्त्वपूर्ण असून, त्याची अंमलबजावणी करणे ही काळाची अनिवार्य गरज का आहे, यासंदर्भात मिलिंदकुमार सोनार यांनी समुपदेशन करताना वर्तमान कटू समाजवास्तव, उपवर मुला मुलींच्या पालकांचे मेळावा पर्यटन यासंदर्भात भाष्य केले. वधु वर परिचय मेळावे ठिकठिकाणी आयोजित केले जातात. मेळाव्यांना पालकांसह उपवर मुलांची तसेच पुनर्विवाह करू इच्छिणारे विधुर, घटस्फोटित समाज बांधवांची देखील लक्षणीय उपस्थिती असते. उपवर समाज भगिनींची उपस्थिती अत्यल्प असते. मेळाव्याच्या वधु वर परिचय पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जातात. व्हॉट्सॲपवर वधु वर परिचय समूहदेखील कार्यरत असून, या समूहांमध्ये उपवर मुला मुलींचे परिचय पत्र आणि फोटो उपलब्ध होत असतात. असे असले, तरीदेखील विवाहनिश्चितीचे प्रमाण केवळ बोटावर मोजण्याएवढेच आहे. पालक विवाहसोहळा थाटात आणि दिमाखात करतात. विवाहसोहळ्यास उपस्थित राहणाऱ्यांची सरबराई करण्यात येते.
विवाह संपन्न होऊन अवघ्या काही दिवसांत किंवा अवघ्या काही महिन्यांत घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात दावे दाखल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आपल्या समाजाच्या शाखीय तसेच सर्व शाखीय समाज संस्था आणि संघटना विपुल प्रमाणात असल्या, तरीही त्यांच्या माध्यमातून विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी पाऊल उचलले जात नाही, ही सखेद आश्चर्याची बाब आहे, असे प्रतिपादन मिलिंदकुमार सोनार यांनी केले.
यावेळी समुपदेशन करताना सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी मार्मिक टीका करताना म्हटले की, विवाहसोहळ्यात प्रचंड आवाजाचे डी जे लावण्यात येतात. त्या कर्णकर्कश आवाजाने वयोवृद्ध वऱ्हाडी मंडळीस हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता असते. लहान बाळांच्या कानाचे पडदे फाटून ते कर्णबधिर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्याप्रमाणे विवाहसोहळ्यात प्रचंड आवाजाचे डी जे लावण्यात येतात, त्याप्रमाणे अवघ्या काही दिवसांत किंवा अवघ्या काही महिन्यांत घटस्फोट दावा जिंकल्याचा सोहळा डी जे लावून साजरा का केला जात नाही? मुलीचे लग्न लावून देणे आणि पोटगी मिळते म्हणून तिला घटस्फोट घ्यायला लावण्याची कुप्रथा अलीकडे वाढत असून, ही कुप्रथा भारतीय विवाहसंस्थेला आणि कुटुंबसंस्कृतीला नष्टप्राय करेल, हे सांगण्यासाठी कुणा भविष्यकाराची गरज नाही. सुजाण समाजबांधवांनी, सुजान कुटुंबप्रमुखांनी वेळीच सावध होऊन आपली कुटुंबसंस्कृती आणि भारतीय विवाहसंस्था टिकविण्यासाठी कंबर कसणे ही काळाची अनिवार्य गरज आहे.
सुवर्ण कारागिरी करणाऱ्या उपवर मुलांचे विवाह निश्चित होत नाहीत, त्यांना मुली पसंत करत नाहीत, अगदी खेड्यापाड्यातील तसेच छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या पालकांनासुद्धा आपल्या मुलीसाठी पुण्या मुंबईत स्वतःचे प्रशस्त घर किंवा ऐसपैस सदनिका (फ्लॅट) असलेला जावईच हवा असतो.
सुवर्ण कारागीर आणि सराफ व्यावसायिक यांच्या संघटनांशी निगडीत पदाधिकारी आणि समाज बांधवांनी सुवर्ण कारागिरी करणाऱ्या उपवर मुलांचे विवाह निश्चित व्हावेत, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, आपल्या संघटनेशी संबंधित सदस्य किंवा पदाधिकाऱ्यांपैकी जे उपवर मुलींचे पालक आहेत, त्यांना सुवर्ण कारागिरी करणाऱ्या उपवर मुलांशी आपल्या मुलीचा विवाह निश्चित करण्यासाठी प्रबोधित केले पाहिजे, असे आवाहनदेखील मिलिंदकुमार सोनार यांनी यावेळी केले.
मिलिंदकुमार सोनार यांनी ॲड. वैभव बागुल यांची सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र (कानूनी परामर्श केंद्र) चे अहिल्यानगर जिल्हा समन्वयक म्हणून, तर ॲड. कमलेश अनिल दाभाडे यांची सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र (कानूनी परामर्श केंद्र) चे कोपरगाव तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे घोषित केले. ॲड बागुल आणि ॲड दाभाडे यांच्या निवडीचे स्वागत उपस्थित समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरात केले.
सर्वश्री उमाकांत बाविस्कर, भाऊसाहेब बागुल, अनिल यादव, प्रकाशशेट भडकवाडे, युवा सोनार समाजसेवक योगेशभाऊ बागुल, दिलीप भालेराव, अशोक नामदेव दुसाने, विश्वनाथ उदावंत, अरुण प्रभाकर जाधव, मनोज विसपुते, साहेबराव बागुल, संजय दाभाडे, विनोद मोरस्कर, प्रकाश घोडके, पंडितशेट यादव, विलास नागरे, सुनील मंडलिक, सुनील विसपुते, दीपक कपिले, गौरव जाधव, रमेश अधिकार, दीपक चव्हाण, सुनील मोरे, दीपकभाऊ विसपुते, निलेश बागुल, जयंत विसपुते, राहुल बागुल, अनिल दाभाडे, संजय प्रभाकर खरोटे आदींसह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.








