रेव्ह पार्टी – एकनाथ खडसे यांचे जावई पुणे पोलिसांच्या ताब्यात

On: July 27, 2025 11:48 AM

पुणे : पुणे येथील खराडी या उच्चभ्रु परिसरात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रात्री उशीरा छापेमारी केली. या पार्टीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांना अटक करण्यात आली आहे. एका फ्लॅटमधे सुरु असलेल्या या पार्टीचे आयोजन प्रांजल खेवलकर यांनी केले असल्याचे म्हटले जात आहे.

तिन महिला व दोन पुरुष यांचा या रेव्ह पार्टीत समावेश होता. दरम्यान हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरु होती असे म्हटले जात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या  छापेमारीत अमली पदार्थ हुक्का, दारु जप्त करण्यात आली आहे.

अटकेतील प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहीणी खडसे – खेवलकर यांचे पती आहेत. अटकेतील खेवलकर यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान या छापेमारीमुळे खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment