दहा रुपयांचे आमीष : मुंबईत चिमुरडीवर अत्याचार

On: September 14, 2020 9:12 PM

मुंबई : ठाणे जिल्ह्याच्या मिरा भाईंदर परिसरात काही दिवसांपुर्वी कोविड सेंटरमध्ये एका विवाहितेवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेची शाई अजून वाळलेली नसतांना एका 5 वर्षांच्या बालीकेवर दहा रुपयांचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना घडली आहे.

या घटनेची माहिती बालिकेच्या आईला समजल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यावेळी बालिकेच्या हातात दहा रुपयांची नोट होती. तिच्या आईने तिला जवळ घेवून विचारपूस केल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडित बालिकेच्या आईने धारावी पोलिस स्टेशनला याप्रकरणी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीची गंभीर दाखल घेत पोलिसांनी आरेपीला अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment