जळगाव – हद्दपार असतांना चॉपरसह खुलेआम फिरणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत धनके, हे.कॉ. गणेश शिरसाळे, संदीप सपकाळे, पो.ना. विकास सातदिवे, पो.कॉ. योगेश घुगे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.







