पोलिस अधिकारी चौकशीच्या भोव-यात – पाच कर्मचारी मात्र दंगा नियंत्रण पथकात

On: August 1, 2025 11:05 AM

नाशिक :  मोक्याच्या पोलिस स्टेशनला बदली करुन देण्याच्या बदल्यात 35 लाखाच्या सौदेबाजी प्रकरणाशी संबंधीत दोघे पोलिस अधिकारी चौकशीच्या भोव-यात सापडले आहेत. या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत पोलिस आयुक्तांनी दिले असल्याचे समजते. तसेच राजकीय नेत्यांसह आयपीएस पोलिस अधिका-यांसोबत मैत्री असल्याचे सांगणा-या सागर पांगरे याच्यासोबत मैत्री असलेल्या पाच पोलिसकर्मींची दंगल नियंत्रण पथकात रवानगी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची नाशिक पोलिस दलात मोठी चर्चा सुरु आहे.  

स्थानिक गुन्हे शाखेत आणि महत्वाच्या पोलिस स्टेशनला बदली मिळवण्याच्या प्रयत्नात सागर पांगरे या कथित राजकीय कार्यकर्त्यासोबत मैत्री असलेल्या पाच पोलिस कर्मचा-यांची दंगा नियंत्रण पथकात बदली करण्यात आली आहे. प्रशांत नागरे (नाशिक रोड पोलिस ठाणे), समाधान चव्हाण, जनार्दन ढाकणे, (एमआयडीसी चुंचाळे), पवन परदेशी (इंदिरानगर), अशोक आव्हाड (अंबड पोलिस ठाणे) अशी दंगल नियंत्रण पथकात बदली करण्यात आलेल्या कर्मचा-यांची नावे आहेत.

भद्रकाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांची इंदिरानगर पोलिस स्टेशनला बदली करुन देण्यासाठी मालेगाव शहर पोलिस स्टेशनचा कर्मचारी नितीन सपकाळे सरसावला होता. सागर पांगरे या कथित राजकीय कार्यकर्त्याच्या मदतीने 35 लाखात आपली बदली करुन देतो या आशयाचा त्याने पो.नि. मनोहर कारंडे यांना फोन केला होता. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनला नितीन सपकाळे याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गोपनीय चौकशी केली असता याप्रकरणी पाच पोलिस कर्मचारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. मोक्याच्या जागी बदलीच्या अपेक्षेने लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी हा एक प्रकारे इशारा दिल्याची चर्चा नाशिक पोलिस दलात सुरु असल्याचे समजते. या देवाण घेवाणीत सहभागी असलेल्या दोघा पोलिस निरीक्षकांची चौकशी सुरु असून त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई होणार असल्याची देखील चर्चा आहे. या देवाण  घेवाणीला काही अधिकारी व कर्मचारी टेंडर हा शब्द वापरतात. ही टेंडर पद्धत खुले आम सुरु असते हे जनतेला चांगल्याप्रकारे माहिती आहे. पब्लिक सर्व काही जाणून आहे. जो सापडतो तो अपराधी आणि जो सापडत नाही तो कोण म्हटला जातो हे देखील जनता जनार्दन समजून आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment