घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : दैनिक सकाळ यवतमाळ आवृतीचे उप संपादक अविनाश साबापुरे यांचे वडील तसेच घाटंजी तालुक्यातील शरद येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग त्र्यंबकराव साबापुरे यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. सद्या ते घाटंजी येथील जेसीस काॅलनीत वास्तव्यास होते.
३ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्या पार्थिवावर घाटंजी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी ललिताताई, सुन सोनाली, प्रगती, मुले शिक्षक विशाल, दैनिक सकाळचे यवतमाळ आवृतीचे उप संपादक अविनाश साबापुरे, नातू वेदांत, भाग्योदय व मोठा आप्त परिवार आहे. शरद (पारवा) हे त्यांचे मूळगाव असून पांढरकवडा येथील सहकारी सूतगिरणीतून त्यांनी आपल्या कष्टिक आयुष्याची सुरवात केली होती. तसेच शेतीतही विविध प्रयोग यशस्वी केले होते. निवृत्तीच्या काळात त्यांनी चित्ररांगोळीचा अनोखा छंद जोपासला होता. घाटंजी आणि पांढरकवडा या दोन्ही तालुक्यात मोठा मित्रपरिवार लाभलेल्या पांडुरंग साबापुरे यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.








