खेडी शिवारातील घरफोडीच्या तपासात तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

On: August 7, 2025 4:30 AM

जळगाव – खेडी शिवारातील शिवनगर परिसरात जानेवारी महिन्यात झालेल्या घरफोडीचा छडा लागला असून, एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील ३,९७,१९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास खेडी शिवारातील शंभु रेसिडेंसी येथील फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासकामी पो.उ.नि. राहुल तायडे, सफौ. विजयसिंग पाटील, पोहेकॉ. रामकृष्ण पाटील, पोकॉ. निलेश पाटील, पोकॉ. विशाल कोळी, पोकॉ. राहुल रगडे यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. तपासाअंती दरम्यान कैलास चिंतामण मोरे आणि जयप्रकाश राजाराम यादव, (दोघे रा. सोनगीर, जि. धुळे) यांना अटक करण्यात आली. पोलिस कोठडी दरम्यान कैलास मोरे याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी सोनगीर येथील त्याच्या राहत्या घरी पंचनामा करून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पो.उ.नि. राहुल तायडे आणि पोकॉ. निलेश पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment