जळगाव – जळगाव शहरातील रोझ गार्डन परिसरात चक्कर येऊन पडलेल्या अनोळखी वृद्ध महिलेचा मृत्यु झाला आहे. तिची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंदाजे 85 वर्ष वय असलेल्या या अनोळखी वृद्ध महिलेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी तिला मयत घोषित केले आहे.
या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली. अकस्मात मृत्युच्या तपासकामी वारसांचा शोध लागणे गरजेचे आहे. या वृद्ध महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास जळगाव शहर पोलिस स्टेशनला 7738341022 या क्रमांकावर जितेंद्र तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







