फरार घरफोड्या शिकवणसिंग गजाआड

On: August 8, 2025 5:06 PM

जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार असलेला शिकवणसिंग टाक यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गजाआड केले आहे. 16 एप्रिल 2025 रोजी एमआयडीसी परिसरातील जगवानी नगर गेट समोरील दुकानाचे शटर वाकवून 1 लाख 85 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांची चोरी झाली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासात दोघा चोरट्यांना जेरबंद करण्यात आले होते. मात्र शिकवणसिंग टाक हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो पोलिसांच्या हातावर तुरी देत हाती लागत नव्हता. त्याच्या शोधकामी पो.नि. बबन आव्हाड यांनी फौजदार राहुल तायडे, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे.कॉ. गणेश शिरसाळे, पोलिस नाईक प्रदीप चौधरी व पो.कॉ. निलेश पाटील आदींचे पथक तयार केले होते.

फरार शिकवणसिंग हा वाघ नगर परिसरात आला असल्याची माहिती खब-यांकडून पथकाला समजली. शोध पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेत अटक केली. पोलिस कोठडी दरम्यान  त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील 27 हजार रुपये किमतीचे पन्नास किलो वजनाचे जुने व नवे तांब्याचे तार हस्तगत करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार राहुल तायडे व पो.कॉ. निलेश पाटील करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment